मनमाड – श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्टतर्फे यंदा कोरोनाच्या संकट काळात आपली सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय जबाबदारी जपत यंदाच्या २५ (रौप्यमहोत्सवी) वर्षानिमित्त एक दिवाळी सर्वांच्या आनंदाची हा एक अभिनव सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमातंर्गत सुमारे ८५० पेक्षा जास्त गरजू गरीब कुटूंबियांना ७५० ग्रॅम उत्तम प्रतिचा चिवडा व २५० ग्रॅम लाडू असणारे फराळाचे पाकीटे वाटप करण्यात आले. श्री निलमणी गणेश मंदिर मंडळाचे संदीप शिनकर, अक्षय सानप, दिपक शिंदे, राहूल लांबोळे या प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते या अभिनव सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मनमाड शहरातील बुरकूलवाडी, हनुमान नगर, वीर सावरकर नगर, हुडको, शिवाजी नगर नं.२ परिसर, ५२ नंबर परिसर, शाकुंतल नगर यांच्यासह विविध आदिवासी वस्तीवर हे फराळ वाटप करण्यात आले. श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्टतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमास मनमाड शहर व परराज्य व परदेशातून देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्वरुपात व वस्तुस्वरुपात अनेक ज्ञात अज्ञात दानशूर लोकांनी मदत केली.
या उपक्रमास निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितीन पांडे, विश्वस्त गोविंद रसाळ, शेखर पांगुळ, प्रज्ञेश खांदाट कृष्णा शिंपी आदी मान्यवरांसह रोहित कुलकर्णी, भरत छाबडा, सूर्यभान वडक्ते, क्रांती आव्हाड, सौरभ मुनोत, प्रशांत चंद्रात्रे, सचिन व्यवहारे, अंकिता पांगुळ, प्रतिक पांगुळ, निळकंठ त्रिभूवन, ओम बावीस्कर, अभिषेक पितृभक्त, बबलूशेठ बन्सल, उपेंद्रशेठ पाठक, दगडूशेठ मुथा, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, शिवाजी पाटील, सुनिल परदेशी, राजेंद्र खैरे, संजय कांगणे,संतोष भराडे सर प्रशांत कातकडे आदी प्रमुख मान्यवरांसह अनेक व्यक्ती व संस्था यांची बहुमूल्य सहकार्य लाभले. या श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टच्या अभिनव उपक्रमामुळे शहरातील खर्या अर्थाने गरजू व पिडीत असणार्या बांधवांची यंदाची दिवाळी अतिशय आनंदाची व गोड झाली. श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट यापुढेही अशाच पध्दतीचे सामाजिक उपक्रम राबविणार आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करावे असे सांगत विश्वस्त मंडळाने सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.