मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द असणारा वेशीतील श्री निलमणी गणेश मंडळाच्या पार्थिव गणेश मुर्तीचे विसर्जन पारंपारिक साध्या पद्धतीने संपन्न झाले. आम्ही परंपरा पाळतो, आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो , हे ब्रीदवाक्य घेवून श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे १९९७ पासून यंदा सलग २४ व्या वर्षी कोरोनाच्या संकट मध्ये सर्व नियम पाळत सामाजिक अंतर ठेवत उत्सव साजरा केला. मनमाडचे प्रथम नागरिक व नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या हस्ते सकाळी महाआरती होवून विसर्जन सोहळा कार्यक्रम शुभारंभाचा नारळ वाढविण्यात आला. यंदाच्या विसर्जन मध्ये भगवा ध्वज, श्री निलमणीच्या पालखी ही वाहन मध्ये शंखनादाने विसर्जन स्थळ श्री गणेश कुंड येथे नेण्यात आली. या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्ति विसर्जन कार्यक्रमचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टचे विश्वस्त नितीन पांडे, शेखर पांगुळ, किशोर गुजराथी, गोविंद रसाळ, कृष्णा शिंपी, प्रज्ञेश खांदाट यांनी केले. तर या विसर्जन कार्यक्रमात रोहित कुलकर्णी, सचिन वडक्ते, सचिन व्यवहारे, संदीप शिनकर, भरत छाबडा, सूर्यभान वडक्ते, अक्षय सानप, राहुल लांबोळे, सौरभ मुनोत, दीपक शिंदे, दिक्षा पांगुळ, नीलकंठ त्रिभुवन, प्रतीक पांगुळ, प्रणव ललवाणी, संजय पठाड़े,आदी प्रमुखांसह कोरोना संकट मुळे श्री गणेश भक्त भाविकांनी अतिशय अल्प संख्येने सहभाग नोंदवला. मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे साहेब यांच्या मार्गदर्शनात या विसर्जनसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विसर्जन कार्यक्रम संयोजन करण्यात आले.