मनमाड – येथील भारत दूरसंचार निगमच्या कॉलनी मधून टेलिफोनच्या विविध साहित्याची चोरी करतांना पोलिसांनी तीन जणांना एका चार चाकी गाडिसह रंगेहात पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बीएसएनएलचे अधिकारी के.एस.देवरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,पोलिस गस्त घालत असतांना तीन जण बीएसएनएलच्या विविध वस्तुची चोरी करतांना मिळून आले. त्यांनी ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. बीएसएनएलच्या कॉलनीमध्ये विविध वस्तु चोरुन नेत असतांना चोरटयांना पकडले. पोलिस सरकारी वाहनाने रात्रीचे सुमारास गस्तीवर असता त्यांना येवला रोडवरील भारत दूरसंचारच्या कॉलनीच्या पाठीमागे १४ नंबर मराठी शाळेजवळ तीन इसम निलेश बाळू अहिरे,२४, राहणार महानंदा नगर पाण्याच्या टाकीजवळ, उदय सूर्यकांत साळुंखे,३० राहणार रमाबाई नगर ,प्रवीण बाळू आहिरे ३१, राहणार आयोध्यानगर सर्व राहणार मनमाड हे निळ्या रंगाची ओमनी मारुती व्हॅन नंबर एम.एच. १५ बी.एन.७१९० हे बीएसएनएल कंपनीचा सरकारी मुद्देमाल चोरून घेऊन जाताना मिळून आले. पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन सदरचा मुद्देमाल पोलिस स्थानकात जमा केला. सरकारी मुद्दे मालाची खात्री करून देवरे यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी वरील तिघांना अटक केली. पोलिसांनी पकडलेले तीन इसम व निळ्या रंगाची ओमनी मारुती कार ही पोलिसांनी जमा केली आहे. यामध्ये तांब्या-पितळेची रॅपिंग मटेरियल यामध्ये टेलिफोन वायरचे कनेक्टर,अठरा रिले टाइप कंनेक्टर, १२ विंडो ॲल्युमिनियम वायरी, आदिसह ओमनी मारुती व्हॅन आणि साहित्य आदि १ लाख लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.