मनमाड – शहरातील तलाठी कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हजार रुपयांची लाच घेणा-या शिपायाला रंगेहाथ पकडले. सातबारा उताऱ्यावर वारसाचे नाव लावण्यासाठी शिपाई राजू पाटील यांनी ही लाच मागितली होती. या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे.
एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ना खाऊगा और ना खाने दुगा असे म्हणत देशाला भ्रष्ट्राचारमुक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करींत असताना दुसरीकडे मात्र आज ही देशात गावखेड्यापासून शहरा पर्यंत भ्रष्टाचार सुरूच असल्याचे अनेंक घटना समोर येत आहे, अशीच एक घटना आज (मंगळवार) मनमाड शहरात घडली. या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील पालिके जवळ असलेल्या तलाठी कार्यालयात पैसे दिल्या शिवाय कोणते ही काम होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून छोट्या-छोट्या कामासाठी लोकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहे. शहरातील एका तरुणाने वडिलांच्या निधना नंतर वारसाचे नाव लावण्यासाठी सर्व कागदोपत्राची पूर्तता केली होती. मात्र सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी या तरुणाकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याचे काम बाजूला ठेवण्यात आले होते. गेल्या काही महिन्या पासून हा तरुण तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत होता. मात्र जो पर्यंत पैसे देणार नाही तुझे काम होणार नाही, असे उत्तर या तरुणाला मिळाल्या नंतर त्याने लाच मागणाऱ्यान धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आणि थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधूंन तक्रार दाखल केली.त्यानंतर एसीबीने तलाठी कार्यालया जवळ सापळा रचला या सापळ्यात दीड हजार रुपयाची लाच घेतांना शिपाई राजू पाटील अडकला. एसीबीने लाच घेताना त्याला रंगे हात पकडल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे