मनमाड – शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे येथे डीएसएचसी सेंटर उघडावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने तालुका वैद्यकिय अधिका-यांकडे केली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, शहराध्यक्ष पी.आर. निळे, जिल्हा सचिव कादिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा नेते यशवंत बागुल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले.
या निवेदनात शहरात कोरोनाबाधितांची संख्या ६५० झाली आहे. तर १६ जणांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना योग्य उपचार करण्यासाठी डीएसएचसी सेंटरची गरज आहे. ही मागणी त्वरीत पूर्ण करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी संतोष भोसले, उत्तम भालेराव, सुरेश जगताप, आम्रपाली निकम, रश्मीताई शिंदे हे उपस्थितीत होते.