नाशिक – शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या काश्या-आई मंदिराच्या बाजूला असणाऱ्या हेमंत देशमुख यांच्या साई असोसिएट या ऑफिसमधून चोरट्यानी कपाट फोडत दोन लाख रुपयांची रक्कम चोरून नेले. देशमुख हे बॅंकेचे होम लोन काढून देण्याचे काम करीत असतात,आज बॅंकेत पैसे भरण्यासाठी त्यांनी दोन लाखाची कॅश ऑफिस मध्ये आणून ठेवली होती. मनमाड शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे.