मनमाड – गेल्या चार महिन्यापासून कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीला काहीसा ब्रेक लागला असून मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे ५०० ते ६०० रुपये पर्यंत सुधारणा झाली आहे.आज कांद्याला प्रती क्विंटल सरासरी २०५० रुपये इतका भाव मिळाला आहे. गेल्या काही महिन्यापासून कांद्याला मातीमोल भाव मिळत होता. मात्र आता कांद्याच्या भावात सुधारणा झाली असल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले
नाशिक जिल्ह्यात लासलगाव प्रमाणेच मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती देखील महत्वपूर्ण मानली जाते येथे वेगवेगळ्या भागातील हजारो शेतकरी कांदा,मका,भाजीपाला यासह इतर शेतमाल घेऊन येतात.सर्वात जास्त कांद्याची आवक होते मात्र गेल्या काही महिन्या पासून कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणातकोसळून कांद्याला कमीत कमी २०० रुपये,जास्तीजास्त ८०० ते ९०० रुपये तर सरासरी ५०० ते ७०० रुपये प्रती क्विंटल अर्थात ५ ते ७ रुपये प्रती किलो भाव मिळत होता.एक किलो कांदा पिकविण्यासाठी किमान १२ ते १५ रुपये खर्च येतो मात्र भाव केवळ ५ ते ७ रुपये मिलता होता त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र आता कांद्याच्या भावात काहीसी सुधारणा झाली असून आज बाजार समितीत कांद्याची सुमारे १५ हजार क्विंटल आवक होऊन कांद्याला कमीत कमी ४०० रुपये जास्तीतजास्त २१९० रुपये तर सरासरी २०५० रुपये इतका भाव मिळत आहे. सध्या जो भाव मिळत आहे त्यात मागे झालेले नुकसान काही प्रमाणात भरून निघेल असे शेतकऱ्यांनी सांगितले.