मनमाड – गेल्या पंधरा वर्षापासून मनमाड परिसरामध्ये रूग्णोपयोगी सेवा देणाऱ्या आनंद सेवा केंद्रातर्फे कोरोनाच्या महामारी मध्ये मनमाडमध्ये ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे पाच मशीन मनमाडकरच्या सेवेमध्ये दाखल झाले. यासाठी भंडारी ज्वेलर्स चे संचालक अनिल शेठ भंडारी यांनी एक मशीन, सुराणा परिवार तर्फे एक मशीन, कंचनसुधा इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष अजय जैन यांच्या कडून देखील एक मशीन देण्यात आले. तसेच ज्येष्ठ व्यापारी नंदलाल बेदमुथा, विशाल हिरालाल लुणावत, सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण भैय्या सोनवणे, युवा व्यापारी अमोल देव, संतोष धांदल यांच्याकडून देखील मशीनसाठी भरघोस मदत करण्यात आली.
या याप्रसंगी दानदात्यांचा सन्मान संघपती रिखबशेठ ललवाणी, अध्यक्ष पोपटशेठ सुराणा , पोपटशेठ बेदमुथा, अजित सुराणा , बाळूकाका हिरण यांच्याकडून करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी मनोगतामध्ये आनंद सेवा केंद्राच्या कार्याचे कौतुक केले. ही सेवा आजच्या काळामध्ये फारच गरजेची आहे. या सेवा कार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन आनंद सेवा केंद्रचे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा व उपाध्यक्ष योगेश भंडारी यांनी केले. याप्रसंगी विजू शेठ बेदमुथा,सुनील शेठ भंडारी ,राकेश शेठ ललवाणी ,मयूर भाऊ हिरण , परेशशेठ राका,संदेश बेदमुथा, उमेश शेट ललवाणी ,चंद्रकांत बेदमुथा ,अभिजित लोढा, परेश भंडारी , रामू जैन , सचिन बेदमुथा, भिकचंद नाबेडा, ललित धांदल अनुप पांडे ,दीपक शर्मा, नितीन आहेरराव,आर्यन भंडारी आदी उपस्थित होते. कल्पेश बेदमुथा यांनी सर्वांचे आभार मानले.