मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिध्द असणार्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरातील मुर्तीची स्थापना शासकीय नियमांचे पालन करून अत्यंत साध्या पध्दतीने करण्यात आली. शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्या निलमणी गणपतीची मानाच्या पालखीने मिरवणूक असते. पण, यावेळेस कोरोनाच्या संकटामुळे साध्या पध्दतीने स्थापना करण्यात आली.
सकाळी पार्थिव मूर्ति मात्र मानाच्या पालखी मध्ये ठेऊन लगेच मंदिरात नेण्यात आली. पुरोहितांच्या मार्गदर्शनाने वेदमंत्रांच्या घोषात शंखनादने श्री निलमणी गणेश मंडळाचे सदस्य सौ. व श्री सचिन व्यवहारे यांच्या हस्ते पार्थिव मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. कोरोना संकट पहाता ट्रस्ट तर्फे श्री नीलमणी ची महाआरती दररोज रात्री ८ वाजता shri nilmani ganesh mandir manmad या फेसबुक पेज वरुन गणेश भक्तांना लाईव्ह पाहता येणार आहे. या स्थापना धार्मिक कार्यक्रम मध्ये श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टचे विश्वस्त नितीन पांडे, शेखर पांगुळ, गोविंद रसाळ, किशोर गुजराथी, नीलमणी गणेश मंडळचे सूर्यभान वडक्ते, रोहित कुलकर्णी, सचिन वडक्ते, भरत छाबड़ा ,रामदास इप्पर,अक्षय सानप, नीलकंठ त्रिभुवन सौरभ मुनोत, अथर्व गुजराथी मनोज छाबडा, क्रांती आव्हाड, शाम शाकद्विपी, राहुल लांबोळे, अक्षय छाबडा, प्रतीक पांगुळ,आदी मान्यवरांसह अतिशय अल्प संख्येने गणेशभक्त सहभागी झाले होते. पुढील ११ दिवस श्री निलमणी गणेश मंदिरात सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी यंदा गणेश उत्सव घरीच साजरा करावा असे आवाहन ट्रस्टने केले आहे.