नाशिक – मनमाड शहरासह आसपासच्या भागातील कोविड-१९ रूग्णांना उपचारासाठी नाशिक शहरात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे मनमाडमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे रूपांतर १०० खाटांच्या कोविड सेंटरमध्ये (डीसीएचसी) करण्यात येणार आहे.
मनमाड शहरासह आसपासच्या भागातील कोविड -१९ रूग्णांना उपचारासाठी वारंवार नाशिक शहरात जावे लागते, तसेच मनमाड नाशिक अंतर जास्त असल्याने रुग्णांचे हाल होतात. रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्यास एका आठवड्यात डीसीएचसीचे रूपांतर होईल, असे नाशिक जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, त्यांनी स्पष्ट केले की, मनमाड शहर हे जिल्ह्यातील गर्दीच्या शहरांपैकी एक आहे, या ठिकाणी रेल्वे जंक्शन, तेल कंपन्या आणि इतर काही उद्योग आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी असते. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गर्भवती महिला प्रसूती सुविधा असून मनमाड नगरपालिका रुग्णालयात आणि रेल्वे रूग्णालयात इतर बिगर-कोविड रूग्ण जाऊ शकतात, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कोविड सेंटरमुळे परिसरातील कोरोना बाधितांवर स्थानिक पातळीवरच चांगले उपचार होऊ शकणार आहेत.