नाशिक – महानगरपालिकेच्यावतीने लक्ष्मी पूजनाचा समारंभ शनिवारी दुपारच्या सुमारास संपन्न झाला. आयुक्त कैलास जाधव, महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांनी मास्क लावूनच पुजा केली. त्यामुळे ही बाब उल्लेखनीय ठरली.
कोषगारातील तिजोरीचे महापौर सतीश कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव, सौ. निना जाधव, स्थायी समिती सभापती गणेश गिते व सौ. दिपाली गिते यांचे शुभहस्ते विधीवत पुजन करून लक्ष्मी पूजन करण्यात आले. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन कोषगार येथे झालेल्या कार्यक्रमास सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, नगरसेविका वत्सला खैरे, शहर अभियंता संजय घुगे, मुख्य लेखाधिकारी नरेंद्र महाजन, उप मुख्य लेखाधिकारी गुलाब गावित, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,मोहन ठाकरे,अजय कमोद,कैलास दराडे,अजय शिरसाठ,वैभव कुलकर्णी,चारुदत्त जाधव,आयान गिते,दादाभाऊ चौरे,हंसराज वर्मा,गोकुळ राऊत,मनीष कांबळे, वैभव मोटकरी,अरुण महाले,धनंजय सोनवणे,रवी पवार,संतोष कान्हे, हुसेन पठाण, विशाल घागरे,विश्वास जोगी,सुनील मोरे,दप्तरे तसेच म न पा पदाधिकारी , अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.