नाशिक – कोरोना निर्बंधांचे पालन होते आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव हे स्वतः च रस्त्यावर उतरले आहेत. आयुक्तांसमवेत असलेल्या पथकाने कॉलेजरोड परिसरातील हॉटेल्सची अचानक तपासी केली. २ हॉटेल्समध्ये कोरोना निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याप्रकरणी या दोन्ही हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील कॉलेज रोड व परिसरातील दोन हॉटेलमध्ये अचानक व्हिजिट करून पाहणी केली. त्या ठिकाणी ५० टक्के पेक्षा जास्त ग्राहक असल्याने व सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसल्याने या दोन्ही हॉटेलवर पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असून त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यातील एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिका व नाशिक शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त जाधव, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, मनपा व पोलीस विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने कॉलेज रोड परिसरातील हॉटेलची पाहणी केली.










