नाशिक – ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णाला बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आणि मध्यरात्रीच्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरातील कोरोना प्रादुर्भाव आणि रुग्णांची स्थिती हा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. बाधितांना बेड मिळत नसल्याची तक्रार यापूर्वीही केली जात होती. मात्र, या घटनेमुळे शहरातील विदारक स्थिती सर्वांसमोर आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर महापालिका काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.