नाशिक – महापालिकेच्या कार्यालयांमध्ये सौर वीज वापरास सुरूवात झाली आहे. महापालिकेच्या सात कार्यालयांमध्ये ३६० किलोवॅट वीजेचा वापर होत आहे. ऑक्टोबर, २०१९ ते ऑक्टोबर, २०२० दरम्यान या कार्यालयांमध्ये सौर वीज वापरण्यात येत आहे. यामुळे महापालिकेचे वीज बिलापोटी खर्च होणाऱ्या पैशांमध्ये जवळपास ६० टक्के पैशांची बचत झाली आहे. उर्वरीत ठिकाणीही लवकरच सौर वीज निर्मिती होणार आहे.
सौर ऊर्जा प्रकल्प हा नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत होत असून पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येत असल्याने स्मार्ट सिटी फंडातील एक रुपयाही यासाठी खर्च होत नाही. नागरिकांनीही सौर उर्जेकडे वळावे आणि पारंपारिक उर्जा स्त्रोतांवरील भार कमी व्हावा हा यामागील मुख्य हेतू आहे. सर्व कार्यालयांसाठी आणि पूर्ण क्षमतेने सौर उर्जा निर्मिती सुरू झाल्यास महापालिकेचे वर्षाकाठी १ कोटी रुपये वाचणार आहेत.
या ७ ठिकाणी एकूण ३६० किलोवॅट वीज निर्मिती सुरू
१. राजीव गांधी भवन (नाशिक महानगर पालिका मुख्यालय) येथे २०७.२ किलोवॅट वीज.
२. लोकनेते पंडीतराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय येथे (पार्ट – ए) २५.१६ किलोवॅट वीज.
३. लोकनेते पंडीतराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय येथे (पार्ट – बी) ३१.४५ किलोवॅट वीज.
४. जिजामाता हॉस्पिटल येथे १३.२ किलोवॅट वीज.
५. नाशिकरोड विभागीय कार्यालय येथे ५२.८ किलोवॅट वीज.
६. शिंगाडा तलाव अग्निशमन केंद्र येथे १३.२ किलोवॅट वीज.
७. सिडको विभागीय कार्यालय ऑफीस येथे १५.५४ किलोवॅट वीज.
येथेही लवकरच सौर उर्जा निर्मिती
८. मायको हॉस्पिटल येथे १०. ५६ किलोवॅट वीज.
९. महापालिकेचे पंचवटी विभागातील अग्निशमन केंद्र येथे २६.४ किलोवॅट वीज.
१०. महात्मा फुले कलादालन येथे ५९.२ किलोवॅट वीज.
११. फाळके स्मारक येथे ६६.३३ किलोवॅट वीज.
१२. झाकीर हुसैन रुग्णालय १००.६४ किलोवॅट वीज.
१३. न्यू बिटको हॉस्पिटल ९८.४२ किलोवॅट वीज.
१४. मुकणे WTP १३८ किलोवॅट वीज.
१५. शिवाजी नगर WTP ११८ किलोवॅट वीज.