शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात ऑटोमोबाईल उत्पादनांची केली विक्रमी वाहतुक

by Gautam Sancheti
मार्च 23, 2021 | 12:07 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20210323 WA0033

मुंबई – वाहन उद्योगाने रेल्वेने वाहतुकीला पसंती दाखवली असून चालू आर्थिक वर्षात मोटारींच्या वाहतुकीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. मध्ये रेल्वेने या वाहतुकीसाठी मुंबई विभागातील कळंबोली, भुसावळ विभागातील नाशिक रोड, पुणे विभागातील चिंचवड स्टेशन, सोलापूर विभागातील बाळे स्टेशन व नागपूर विभागातील अजनी स्थानक येथे वाहनांच्या वाहतुकीसाठी लोडिंग सुविधा विकसित केल्या आहे. येथून फेब्रुवारी २०२१ मध्ये रेल्वेने ३२ रेक लोड केले आहेत  तर गेल्या वर्षीच्या याच महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२० मध्ये १२ रेक लोड केले होते. म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये १६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ऑटोमोबाईलच्या २४६ रेकची लोडिंग झाली आहे तर गतवर्षीच्या याच कालावधीत म्हणजे एप्रिल – २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत ११८ रेक लोड झाले. चालू वर्षाच्या लोडिंगमध्ये १४६ टक्क्यांनी वाढ दिसून आली. गेल्या वर्षभरात ऑटोमोबाईलची वाहतूक देशाच्या विविध भागात केली गेली आणि बांगलादेशात निर्यातही केली गेली. रेल्वेच्या या उपक्रमामुळे मौल्यवान इंधनाच्या बचतीसह कार्बन फूटप्रिंटची बचत होते.
मध्य रेल्वेने क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) स्थापित केले आहेत. हे व्यवसाय विकास युनिट स्थानिक उद्योगांसह नवीन प्रस्ताव आणि लवचिक योजनांचे मार्केटिंग करतात आणि त्यांच्या मागण्याचा विश्लेषण करतात. अशा उपक्रमांत मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा, मेसर्स टाटा मोटर्स आणि मेसर्स मारुती उद्योग इत्यादी प्रमुख मोटार वाहन उद्योगांशी कार, पिक-अप व्हॅन, ट्रॅक्टर, जीप इत्यादीच्या वाहतुकी संदर्भात बैठका आयोजित केल्या गेल्या.
मध्य रेल्वेने ऑटोमोबाईल उत्पादकांशी व्यवसाय विकास युनिटच्या संवादादरम्यान, त्यांच्या सूचनांचेही स्वागत केले गेले. या दिशेने, मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेने ऑटोमोबाईल वाहनांना सहजपणे  लोड करण्यासाठी व वाहून नेण्यासाठी प्रोटोटाइप कोच विकसित केला आहे आणि उत्पादकांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून वाहतुकीची गती वाढविली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – दुकान फोडून चोरट्यांनी कत्तलीसाठी आणले पाच बोकड

Next Post

४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लस,  मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्राकडून मान्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
udhav thakre 1

४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लस,  मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्राकडून मान्य

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011