नाशिक – मध्य रेल्वे विभागाने मुंबई आणि उत्तर भारतातील विविध प्रातांदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी दुरंतो आणि गरीब रथ यांच्यासह तीन विशेष गाड्या सुरू केल्या असून त्यापैकी दोन विशेष गाडया या नाशिकरोड रेल्वे स्थानकात दोन्ही दिशेने जाताना ( अप आणि डाऊन )थांबतील.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकमान्य टिळक टर्मिनस ते प्रयागराज द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दर रविवारी व मंगळवारी सकाळी ५ : २३ वाजता धावेल आणि दुसर्या दिवशी सकाळी ८ :५० वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. गाडीचा परतीचा प्रवास दर सोमवारी आणि बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होईल आणि दुसर्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचेल.
तसेच लोकमान्य टिळक ते प्रयागराज दरम्यानची दुय्यम स्थानक असलेली दुरांतो एक्स्प्रेस दर सोमवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५: २५ वाजता लोकमान्य टिळक एक्स्प्रेस टर्मिनस येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी १२ : ४५ वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे तिचा परतीचा प्रवास दर मंगळवार आणि शनिवारी सायंकाळी
७: २० वाजता सुरू होईल आणि दुपारी २: ५५ वाजता गंतव्यस्थानावर पोहोचेल. मध्य रेल्वेने सुरू केलेली तिसरी ट्रेन मुंबई-जबलपूर गरीब रथ विशेष ट्रेन आहे. ही मध्य प्रदेशातील जबलपूर येथून मुंबईकडे दर सोमवारी, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी ७: ४५ वाजता सुरू होईल आणि दुसर्या दिवशी दुपारी १२: २० वाजता गंतव्यस्थानात पोहोचेल.