सिधी – मध्य प्रदेशमध्ये एका बसच्या अपघातात ३० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये ५४ प्रवाशी होते.
सिधी जिल्ह्यातील रिवा-सिधी बॉर्डरच्या जवळ कालव्यात बस कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात काही जणांना सुखरुप वाचवण्यात आले आहेत. या घटनेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी बचाव कार्य आणि मदत करण्याचे आदेश सरकारी अधिका-यांना दिले आहेत.
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. सिद्धी येथून सतनाच्या दिशेने ही बस जात होती. या बसममध्ये ३९ प्रवाशांनी तिकीट बुक केले होते. त्यानंतर रस्त्यात आणखी काही प्रवाशी बसमध्ये बसले होते.
या अपघातात अजून काही जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातात अजून काही जणांचा मृत्यू झालेला असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.