नाशिक – बहिणीच्या मुलास मारहाण होत असताना मध्यस्थीसाठी धावून गेलेल्या दाम्पत्यास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना लहवित येथे घडली. याघटनेत महिलेच्या डोक्यात लोखंडी पाईप मारण्यात आल्याने ती जखमी झाली असून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत गहाळ झाली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक गायकवाड,रोहित गायकवाड,नितीन गायकवाड व सुनिता गायकवाड (रा.लहवित ता.जि.नाशिक) अशी मारहाण करणाºया संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी वनिता शंकर गायकवाड (रा.लहवित बाजगिरा,सुमन लॉन्स समोर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.३) रोजी लहवित येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ वनिता गायकवाड यांच्या बहिणीचा मुलगा आकाश गायकवाड यास संशयीत अज्ञात कारणातून मारहाण करीत होते. यावेळी वनिता गायकवाड आणि शंकर गायकवाड हे काका मावशी आकाशच्या बचावासाठी धावून गेले असता ही घटना घडली. काका मावशी टोळक्यास समजवून सांगत असतांना संशयीतांनी शिवीगाळ करीत दांम्पत्यास मारहाण केली. यावेळी रोहित गायकवाड याने वनिता गायकवाड यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून जखमी केले असून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत गहाळ झाली आहे. अधिक तपास जमादार राठोड करीत आहेत.