मुंबई – मधुमेह किंवा डायबिटीज हा एक असा रोग आहे की ज्यामध्ये रोग्याला अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागते अन्यथा खूप नुकसान होण्याची शक्यता असते. मधुमेह बहुतांश अनुवांशिक असतो. शिवाय वाढत्या वयाबरोबर आणि तणावपूर्ण अश्या जीवनशैलीमुळे, वजन वाढल्यामुळे सुद्धा मधुमेहाचा विकार होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहावर विशेष लक्ष असणे आवश्यक आहे. एकदा मधुमेहाचे निदान झाले कr आयुष्यभर त्याच्यासह जगावे लागते.
चला तर आज जाणून घेऊया मधुमेहापासून वाचण्याचे काही घरघुती उपाय…
तुळशीची पाने चावून खा
तुळस एक जीवनदायी औषधी वनस्पती आहे, आणि अनेक रोगांवर गुणकारी आहे. आयुर्वेदात तर तुळशीच्या प्रत्येक भागाला आरोग्यदायी औषध मानले गेले आहे. मधुमेहाच्या रुग्णांना दररोज दोन ते तीन तुळशीची पाने चावून खाल्ली पाहिजेत. मधुमेह नियंत्रित ठेवण्यात हे उपयोगी आहे.
हे ज्यूस प्या
कारले जरी चवीला कडू असले तरी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर रिकाम्यापोटी तुम्ही कारले, दुधी आणि टोमॅटोचा ज्यूस प्यायला हवा.
मेथीचे पाणी
मेथी तर मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे. रात्री एक पेला पाण्यात मेथीचे दाणे भिजत ठेवून सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यावे आणि मेथीचे दाणे चावून खावे. असे केल्यास बराच फायदा होतो.
कडुनिंबाच्या पानांचा ज्यूस
अॅन्टीबायोटिक गुणांनी युक्त असलेले कडुनिंब हे सर्वोच्च औषधी म्हणून गणले जाते. याची चव जरी कडू असली तरी यापासून होणारे लाभ याला अमृतासमान आहेत. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कडूनिंबाच्या पानांचा ज्यूस जरूर प्यायला हवा. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
(टीप – प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्लानुसारच उपचार घ्यावेत)