मुंबई – मधुमेह हा एक असा आजार आहे जो एकदा जडला तर आयुष्यभर पिच्छा सोडत नाही. या आजारात रक्तात गोडाचे प्रमाण वाढून जाते किंवा वाढीस लागते. निष्काळजीपणा केला तर हा आजार धोकादायकही ठरू शकतो. या आजार ब्लड–शुगर नियंत्रणात ठेवणे अत्यंत आव्हानाचे काम असते. त्यासाठी रुग्णांना खाण्यापिण्यावर व आपल्या दिनचर्येवर नियंत्रण ठेवावे लागते. सोबतच नियमित औषधंही घ्यावी लागतात. आपणही मधुमेहाचे रुग्ण असाल तर ब्लड–शुगर कंट्रोल करण्यासाठी आपण केळीची पाने खाऊ शकता.
केळ हे भारतासह कॅरेबियन देशांमध्ये बघायला मिळणारे फळ आहे. आजही भारतात लोक केळीच्या पानांवर जेवण करतात. याची शेती उष्णकटिबंधीय जलवायू प्रदेशात अधिक होते.
केळ खाल्ल्याने वजन वाढतं आणि शरीरात उर्जा संचारते. केळीची फुले आणि पानेही प्रकृतीसाठी फायद्याची आहेत. ते खाल्ल्याने मधुमेहाच्या आजारापासून दिलासा मिळतो. researchgate.net वर प्रकाशित झालेल्या एका संशोधनात केळीच्या पानांचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
केळीची पाने कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. त्यानंतर त्यांना वाटून घेऊन चूर्ण करायचे. त्यानंतर हे पावडर Sucralose (एक प्रकारचे मीठ) आणि पाण्यासोबत मिक्स करायचे. हे मिश्रण मधुमेहाच्या रुग्णांना पिण्याचा सल्ला या संशोधनाने दिला आहे.