मुंबई – सिनेमाच्या प्रत्येक शैलीत उत्कृष्ट कामगिरी करणारे किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. त्यांनी कधीही संगीताचा अभ्यास केला नाही. १९५१ मध्ये अभिनेत्री रुमा गुहाशी त्याचे प्रथम लग्न झाले. त्यावेळी बॉलिवूडमध्ये कोणीही त्यांना ओळखत नव्हते.लग्नानंतर आठ वर्षांनी १९५८ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. यामागील कारण म्हणजे अभिनेत्री मधुबाला.
त्याकाळी विवाहित असूनही किशोरकुमार मधुबालाच्या प्रेमात पडले होते. ज्यावेळी त्यांनी मधुबालाला प्रपोज केले त्यावेळी त्या उपचारासाठी परदेशात होत्या. नंतर किशोरकुमार यांनी रूमाला घटस्फोट दिला आणि मधुबालाशी लग्न केले व इस्लाम धर्म स्वीकारला. त्यांनी स्वतःचे नाव बदलून करीम अब्दुल असे ठेवले होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे नाते कधीही स्वीकारले नाही.
काही वर्षातच मधुबाला यांचे निधन झाले. त्यानंतर किशोर कुमार एकटेच राहिले. मधुबालाच्या मृत्यूनंतर किशोरकुमार यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी विवाह केला. मात्र काही वर्षातच त्याचा विवाह मोडला. त्यांनी एकूण चार वेळा लग्न केले. मात्र केवळ मधुबाला यांच्या प्रेमापोटी इस्लाम धर्माचा स्वीकार करून स्वतःचे नाव बदलले. परंतु, गाण्याची स्वतःची अनोखी शैली त्यांनी विकसित केली. १३ ऑक्टोबर १९८७ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.