हर्षल भट, नाशिक
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च पासून बंद असलेली ग्रंथालये येत्या ३० सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी ग्रंथालय या काळात बंद ठेवण्यात येणार असल्याने सर्व स्तरावर नाराजी व्यक्त होत आहे. अनलॉकची घोषणा करतेवेळी राज्यातील सर्व दारूची दुकाने सुरू करण्यात आले मात्र ग्रंथालये बंद ठेवण्यात आल्याने अनेकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फ प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शासकीय तथा खाजगी ग्रंथालये ३० सप्टेंबर पर्यंत बंद राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रंथालय सेवा सुरू केल्यावर पुस्तक देवघेवच्या निमित्ताने गर्दी वाढू शकते त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ग्रंथालये बंदच ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. संबंधित परिपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले असून ग्रंथालय संचालनायाने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र अनलॉकच्या काळात राज्यातील दारूचे दुकान सुरू करण्यात आल्याने ग्रंथालये का नाही ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. महसूल मिळण्याच्या उद्देशाने शासनाने दारूची दुकाने सुरू केली परंतु ग्रंथालयांवरील बंदी कायम ठेवल्याने सर्व स्तरावरून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. मिशन बिगीन अगेनची घोषणा करताना मदिरालय सुरू मात्र ग्रंथालये बंद या शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. वाचकांनी तसेच लेखकांनी या निर्णयाचा निषेध करत ग्रंथालये सुरू करावे असा पवित्रा हाती घेतला आहे. २५ मार्च पासुन राज्यातील वाचनालये बंद ठेवण्यात आले त्यामुळे आर्थिक स्थितिबिकट होत असल्याने वाचकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
—
राज्य सरकारने वैज्ञानिक दृष्टीकोनातून ग्रंथालय त्वरित सुरु करावी. वाचकांचीही तशी मागणी आहे.
– विद्याधर वालावलकर, अध्यक्ष, मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे