मुंबई – नैसर्गिक आपत्तींच्या मदत वाटपात केंद्र सरकारने भेदभाव केल्याचा आरोप मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने २७०७ कोटी रुपयांची मदत केली आहे. यातुलनेत महाराष्ट्राला अवघे २८८ कोटी रुपयांची मदत केली आहे. केंद्र सरकार आपत्ती ग्रस्तांना मदत देण्यात गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. केंद्रातील भाजप सरकार राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला कमी मदत देऊन घाणेरड्या राजकारणाचे प्रदर्शन करीत आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.