मकर राशीवर शनीचा असा आहे प्रभाव
मकर राशीवर शनि तसेच प्रथम भावात आलेल्या गुरुचा प्रभाव २०२१मध्ये राहणार आहे.
मार्च २०२३ पर्यंत प्रत्यक्ष साडेसातीचा काळ याच वेळात प्रथम भावात आलेला गुरु अशा “कभी खुशी कभी गम” अशा परिस्थितीमुळे मकर राशी असलेल्यांना सर्वच बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. साडेसातीच्या काळामध्ये शब्द जपून बोलणे, कौटुंबिक वाद वाढू न देणे, या काळामध्ये कौटुंबिक जोडीदारांनी एकमेकांच्या भावनांचा व विचारांचा आदर करून परस्परांना सन्मानाने वागवणे अतिशय आवश्यक आहे. आपल्या वागण्या-बोलण्याने गैरसमज होऊ न देणे, शारीरिक वेदनेकडे दुर्लक्ष न करणे, प्रामाणिक प्रयत्न, स्वतःच्या मेहनतीवरचा विश्वास हा या परिस्थितीत आपणास दीपस्तंभ ठरणार आहे.
कोणताही वाद वाढणार नाही याची काळजी घ्यावी. कोर्ट-कचेरी तील दावे सामोपचाराने मिटवता आले तर अती उत्तम. नोकरदारांना वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्यासाठी विशेष प्रकारची मेहनत घ्यावी लागणार आहे. व्यवसायिकांना नवनवीन आयडिया, व्यवसायातील अधिक गुंतवणूक, ग्राहकांशी सलोख्याचे संबंध वअधिक मैत्रीपूर्ण सेवा यातूनच व्यवसाय विस्तार करता येणार आहे. अनुभव नसलेल्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करू नये, प्रत्येक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेऊ नये.
शनिच्या साडेसाती सोबत प्रथम भावात आलेला गुरु हा बर्यापैकी दिलासादायक ठरेल. लांबलेले परदेशगमन योग जुळून येतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी साधता येतील. नियमित व प्रयत्नपूर्वक अभ्यास हा विद्यार्थ्यांसाठी यशोदायी ठरेल. अनुभवी सल्लागार, जीवाभावाचे नातेवाईक, परिचित यांच्याशी सुसंवाद ठेवून साडेसातीचा काळ सहज निभावता येईल.
याच लेखमालेत उद्या आपण पुढच्या राशीबद्दल माहिती घेऊ..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.