नाशिक – नाशिककर भक्त भाविकांना मंदिर खुली करावीत या मागणीसाठी श्री बाणेश्वराला दूध अभिषेक करून श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या पायरीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी ‘हर हर महादेव’, ‘शिववंदना’, ‘रामनाम जप’, ‘उद्धव सरकारने मंदिरे त्वरित खुली करावी’, ‘जयकारा वीर बजरंगी’, ‘जय भवानी’, ‘सनातन हिंदू धर्मकी जय’, ‘अधर्म का नाश हो’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय भवानी जय शिवाजी’, आदी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात रामसिंग बावरी, विनोद थोरात, कैलास देशमुख, सागर देशमुख, सतीश शुक्ल, पुरुषोत्तम आव्हाड, भारत डांगरे, राजेश तेलंग, राजेंद्र नेरकर, मनोज मराठे, राजू वाघ, महादू बेंडकुळे, समाधान कापसे, विशाल रहाणे, गजानन अंधारे, मनोज नवले, आदी सहभागी झाले.