मुंबई – मंदिरे सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करणार असल्याची माहिती आध्यात्मिक समन्वय आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी दिली. अनेक वेळा मागणी करुनही महाराष्ट्र सरकार देवस्थाने सुरु करण्याची परवानगी दिली नाही, यासंबंधी विचार- विनिमय करण्यासाठी मंगळवारी व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक-आध्यात्मिक संघटना, संस्था, प्रमुख देवस्थानांचे अध्यक्ष, विश्वस्त आणि विविध पंथ- संप्रदायांच्या प्रमुख धर्माचार्यांची आभासी बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्राची भाविक जनता, विविध धार्मिक-आध्यात्मिक संस्था,संघटना, विविध देवस्थानांचे विश्वस्त, विविध संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना आम्ही आवाहन करतो की, या पवित्र घंटानाद आंदोलनात आपण सहभागी व्हावे.
आभासी बैठकील असा केला ठराव
राज्यशासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, महाराष्ट्रातले सरकार ती अजूनही मान्य करत नाही. कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या या ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता भाद्रपद शु. ११ शनिवार २९ ऑगस्ट २०२० रोजी, सकाळी ११ वाजता आम्ही देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी राज्यभर “दार उघड उद्धवा दार उघड” अशी आर्त हाक देत “घंटानाद आंदोलन” करणार आहोत.