मनमाड – साडेतीन शक्ती पीठांपैकी संपूर्ण पीठ असलेल्या श्री.क्षेत्र नस्तनपूर येथे शनिवारी मनमाड, नांदगाव भाजपाच्या वतीने टाळ मृदंगाच्या निनादात ‘ घंटानाद ‘ आंदोलन करण्यात आले. या आंदोलना प्रसंगी भारतातील सर्व मंदिरे उघडत असतांना राज्यातील सर्वधर्मीयांचे मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा दर्शनासाठी सुरू करण्यात यावे अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली. या आंदोलनावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन दराडे, मनमाड शहराध्यक्ष जय फुलवाणी, नांदगाव तालुका अध्यक्ष बापूसाहेब जाधव, नांदगाव शहराध्यक्ष उमेश उगले,कांतीलाल लुणावत, सचिन संघवी, सचिन लुणावत, आनंद बोथरा, एकनाथ बोडके, मनमाड शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ. सोनीताई पवार, सौ. स्वाती मुळे, सचिन कांबळे, अमित सोनवणे, आनंद काकडे, भावराव निकम, बु-हाण शेख, पंकज खताळ, डॅा. सागर कोल्हे, उपस्थित होते.