दिंडोरी – महाराष्ट्र सरकारला जागे करून भाविकांसाठी मंदिरे खुले करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. या सरकारच्या अजब गजब निर्णयाने राज्यातील मदिरालय सर्वांसाठी खुले झाले मात्र मंदिरे बंद ठेवून भाविकांची कुचंबणा केली, असा आरोप भाजपने केला आहे.
भाजप आंदोलक यावेळी म्हणाले की, हिंदुतत्वाच्या नावावर मते मागणारे सरकारचे नेतृत्व हिंदू संस्कृतीची उघड उघड गळचेपी करत आहे. दिंडोरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यातील सर्व मंदिरे खुले करण्यासाठी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, तालुका सरचिटणीस नगरसेवक तुषार वाघमारे, योगेश तिडके, शहराध्यक्ष शाम मुरकुटे, मंगला शिंदे, तुषार घोरपडे, रघुनाथ जाधव, रावसाहेब कदम, काकासाहेब देशमुख, दत्तात्रय जाधव, भास्कर कराटे, निलेश गायकवाड, साजन पगारे, अनिकेत जगताप, विनोद चव्हाण, मयुर चव्हाण, धीरज चव्हाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंद मंदिराचे दरवाजे उघडून दर्शन घेतले व घंटानाद आंदोलन केले.