मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या तपासात संदिग्धता असून या प्रकरणात पुणे पोलिसांकडून तपास काढून इतर पोलिसांना तपास द्यावा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. बुधवारी भाजप नेते प्रवीण दरेकर त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणात हत्यारे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्या म्हणाल्या की, पुणे पोलिसांची संदिग्ध भूमिका पहिल्यापासूनच आहे. त्यांच्या चौकशीवर आमचा विश्वास नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एखादा सक्षम अधिकारी नेमणे गरजेचे आहे. ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या त्या सगळ्या संबंधित घटनेशीच संबधीत होत्या. या ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडचे संजय राठोड यांच्याशी झालेला संवाद आहे. असे असतांना पुणे पोलिसांना यासंबंधित कॉल लॉग अरुण राठोडच्या फोनमध्ये सापडला नाही का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला. यावेळी त्यांनी बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आल्याचा आरोप केला. एकाने आपले मंत्रीपद वाचवले आता दुसऱ्याचे काय होणार हे आपण पाहूयात असेही त्या म्हणाल्या.