नाशिक – कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु असले तरी आदिवासी आणि दुर्गम भागात विद्यार्थ्यांना किती समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, याचा प्रत्यय ऐका व्हिडिओतून येत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील साल्हेर पासून ८ ते १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मानूर या गुजरात सरहद्दीवरील छोट्याशा आदिवासी पाड्यावर मोबाइलचे नेटवर्क नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना थेट डोंगरावर जावे लागत आहे. तेथे महत्प्रयासाने नेटवर्क मिळते. त्यातच पावसात या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात. ही हालापेष्टा दूर करा आणि तत्काळ शाळा सुरू करा, अशी मागणी हे विद्यार्थी करीत आहेत.
बघा विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ