मुंबई – राज्यमंत्री बच्चू कडू हे तिसऱ्यांदा विलगीकरणात गेले असल्याची बाब समोर आली आहे. त्यांनी स्वतःच ही बाब सांगितली आहे. ट्विटरवर पोस्ट करुन त्यांनी सर्वांना ही माहिती दिली आहे. यापूर्वी कडू यांची दोनदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांना ताप व अंगदुखीचा त्रास होत आहे. गेल्या १९ फेब्रुवारी रोजी बच्चू कडू यांनी माहिी दिली होी की त्यांची दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले. त्यांनी कोरोनावर मात केली पण पुन्हा आता त्यांना त्रास होत आहे. मी काळजी घेत आहे, आपणही घ्यावी, असे आवाहन कडू यांनी केले आहे.
माझी प्रकृती ठिक नसल्यामुळे पुढील ३ दिवस कृपया कोणीही न विचारता भेटायला येऊ नये. ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली ती निगेटिव्ह आली आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्यामुळे पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) March 27, 2021