वॉशिंग्टन – अमेरिकेची अंतराळ कंपनी नासा आणि जगभारातील वैज्ञानिक मंगळ ग्रहावर पाण्याचा शोध घेत आहेत. मंगळ ग्रहावर कधी पाण्याचं स्त्रोत होतं का, याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. मंगळ ग्रहावर जीवसृष्टी होती का, नासानं एक रोवर मंगळवार पाठवलं आहे. ही सर्व माहिती गोळा करण्यासाठीच रोवर मंगळावर पाठवण्यात आलं आहे. नासानं मंगळ ग्रहावरील अभ्यासाचा अचंबित करणारा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात अचंबित करणारी अशी कोणती माहिती आहे?
मंगळ ग्रहाच्या भूगर्भात पाणी
नासाच्या एका अभ्यासानुसार, मंगळ ग्रहाच्या भूगर्भात बहुतांश हरलवलेलं पाणी दडलेलं आहे. मंगळाचे पाणी अंतराळात गेल्याच्या दाव्याच्या उलट हा दावा करण्यात आला आहे. मंगळाच्या पृष्ठभागावरील पदार्थ्यांच्या परीक्षणानंतर हे लक्षात आलं की, अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर पाणी तर होतेच शिवाय खोल जलाशये आणि समुद्रसुद्धा होते. जर्नल सायन्समध्ये प्रकाशित एका अभ्यासानं सिद्ध झाले आहे की, मंगळावर सध्या असलेल्या पाण्याचा महत्त्वपूर्ण भाग (३० ते ९९ टक्के) ग्रहाच्या भूगर्भातील खनिजांमध्ये फसलेला आहे.
चार अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर पाण्याचा खजिना
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) च्या संशोधकांनुसार, जवळपास चार अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर भरपूर पाणी होतं. तसंच तिथं १०० पासून १५०० मीटर खोल समुद्रसुद्धा होते. एक अब्ज वर्षानंतर हा ग्रह पूर्णपणे सुकून गेला. तो आजतागायत तसाच आहे. मंगळावर गुरुत्वाकर्षण कमी असल्यानं तिथलं पाणी अंतराळात गेल्या दावा यापूर्वी शास्त्रज्ञांनी केला होता. गुरुत्वाकर्षण कमी असल्यानं सगळंच पाणी अंतराळात गेलं नाही, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
? ? Billions of years ago, according to geological evidence, water flowed across Mars & collected into pools, lakes, & oceans. New research shows a substantial quantity of the water — between 30 and 99% — is trapped within minerals in the planet’s crust: https://t.co/8LVttL7jqt pic.twitter.com/T9CRsUAbIb
— NASA (@NASA) March 16, 2021