मुंबई – पंढरपूर येथील मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत. भाजपने समाधान औताडे तर राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भारत भालके यांना संधी दिली आहे. त्यामुळे येथील लढत चुरशीची होणार हे दिसून येत आहे.
भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने ही उमेदवारी जाहीर केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. समाधान औताडे हे गेल्या पाच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतले असून बांधकाम व्यवसायिक आहेत. तसेच ते साखर निर्मिती उद्योगात कार्यरत आहेत. सोलापूर येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालकपद ते भूषवित असून सोलापूर जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.
मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर ही पोटनिवडणूक होत आहे. भगीरथ हे भारत भालके यांचे चिरंजीव आहेत. तसेच, ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षही आहेत. भारत भालके यांच्याच कुटुंबाकडे उमेदवारी देण्यात आल्याने जनतेच्या सहानुभूतीचा फायदा त्यांना होईल, असे बोलले जात आहे.
https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1376480568561524736