सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मंगळवारचा कॉलम – मुक्तांगण – उच्च शिक्षणाचे स्वप्न

सप्टेंबर 8, 2020 | 1:19 am
in इतर
0

उच्च शिक्षणाचे स्वप्न

 

 

दहावी, बारावीच्या यशावरच शैक्षणिक कारकीर्द अवलंबून असल्याने प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करतो. मात्र त्यानंतरही शैक्षणिक स्पर्धेत तग धरू शकतोच असे नाही. शिक्षण आणि उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय साकारण्यासाठी त्यांच्या जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या कौशल्याधिष्ठित शिक्षणाची संधी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे दहावी, बारावी परीक्षेत अपयश आलेल्यांना आता हताश होण्याची आवश्यकता नाही. नोकरी, व्यवसाय सांभाळून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणे शक्य आहे.

IMG 20190511 WA0001
संतोष साबळे
  • संतोष साबळे

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कार्यरत आहेत)

दहावी-बारावीचा निकाल लागला की यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू होतो. पण त्याचवेळी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांकडे साफ दुर्लक्ष होते. सगळीकडे होणाऱ्या अवहेलनेमुळे परीक्षेत अपयश आले म्हणजे जीवनातच अपयश अशीच मनोधैय्यविद्यार्थ्यांची भावना होऊन बसते. परिणामी अशा विद्यार्थ्यांत न्यूनगंड तयार होऊन काही जण आत्महत्येसारखा टोकाचा विचार करतात. पण हे चित्र बदलणे अत्यंत आवश्यक आहे.

आयुष्यात प्रत्येकाला केव्हातरी अपयशाचा सामना करावाच लागतो. त्यामुळे दहावीचे अपयश म्हणजे सगळेच संपले, असा समज करून न घेता नापास झाल्यानंतरही मुक्त शिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी होतानाच समाजातही मोठे स्थान मिळविता येते. नापास झालेल्यांनी पुन्हा जोमाने अभ्यास करून परीक्षा देणे व यश मिळविणे हाच एक उत्तम पर्याय आहे. पण ज्यांना नोकरी, व्यवसाय अशा कारणांनी तेही शक्य नसेल तरीही निराश न होता, मुक्त विद्यापीठाचे असंख्य शिक्षणक्रम असून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रातील डिप्लोमा, डिग्री अथवा प्रमाणपत्र शिक्षणक्रमास प्रवेश घेऊन चांगले करिअरघडविता येईल. पारंपरिक विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांना त्या त्या अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार थेट प्रवेश मिळू शकतो.

कमी कालावधीत अनेक कौशल्ये आणि अनेक विषयातले ज्ञान घेण्याचे हे युग आहे.
ज्ञान आणि कौशल्ये सतत अपडेट करणेही गरजेचे झाले आहे. त्यासाठी प्रत्येकाला आयुष्यभर शिकत राहावे लागणार आहे. नोकरी व्यवसाय सांभाळून शिक्षणाचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठाने काम करता-करता शिक्षण हा दूरस्थ शिक्षण पद्धतीतला उत्तम पर्याय दिला आहे. या शिक्षण पद्धतीत रोज महाविद्यालयात जायची गरज नसल्याने पारंपरिक विद्यापीठाची एक पदवी घेत असताना विद्यार्थी मुक्त विद्यापीठाची आणखी एक पदवी किंवा पदविका घेऊ शकतो. कोणत्याही पारंपरिक विद्यापीठात शिक्षण घेत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठाने पूर्वतयारी शिक्षणक्रम आखला आहे.

समाजाच्या गरजा ओळखून विद्यापीठाने आठ विद्याशाखा सुरू केल्या आहेत. त्यात मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे, वाणिज्य व व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, निरंतर शिक्षण, कृषिविज्ञान आणि आरोग्य अशा आठ विद्याशाखांचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक सेवा विभाग कार्यरत आहे. विद्यापीठाने सुरु केलेल्या विद्याशाखा पुढीलप्रमाणे :-

 मानवविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा,

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा,

शिक्षणशास्त्र विद्याशाखा,

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा,

संगणकशास्त्र विद्याशाखा,

कृषी विज्ञान विद्याशाखा,

निरंतर शिक्षण विद्याशाखा,

आरोग्य विज्ञान विद्याशाखा,

शैक्षणिक सेवा विभाग

विभागीय केंद्रे त्या अंतर्गत येणारे जिल्हे पुढीलप्रमाणे :

१) अमरावती विभाग (अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम) पत्ता- व्ही.एम.व्ही ते वलगाव रोड, पोस्ट- व्ही.एम.व्ही, अमरावती – ४४४ ६०४, दूरध्वनी (०७२१) -२५३१४४५

२) औरंगाबाद विभाग (औरंगाबाद, बीड, जालना) पत्ता – नंदनवन कॉलनी, छावणी, औरंगाबाद. ९४२२२४७२९३ (०२४०) २३७१०६६

३) मुंबई विभाग (मुंबई) पत्ता- जगन्नाथ शंकरशेठ म. न .पा ची मराठी प्राथ. शाळा, दुसरा मजला, फ्रेअर ब्रीज, (साऊथ) नाना चौक, ग्रँट रोड (प), मुंबई ४०० ००७, दूरध्वनी (०२२) -२३८७४

४) नागपूर विभाग (नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा) पत्ता – राव बहादूर डी. लक्ष्मीनारायण बंगला, विद्यापीठ क्रीडा परिसर, लॉ कॉलेज रोड, रविनगर चौक, नागपूर ४४० ००१, दूरध्वनी (०७१२) – २५५३७२४

५) नाशिक विभाग (नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार) पत्ता- नाशिक महानगरपालिकेची जुनी इमारत, दुसरा मजला, पंडित कॉलनी, नाशिक. ४२२ २२२, दूरध्वनी – (०२५३) – २३१७०६३

६) पुणे विभाग ( पुणे, सातारा) पत्ता – शाहीर अण्णाभाऊ साठे प्रशाला, महापालिका शाळा क्र. ५ (मुलांची) ६५४, सदाशिव पेठ, कुमठेकर रोड, पुणे. ४११ ०३०, दूरध्वनी – (०२०) -२४४५७९१४

७) कोल्हापूर विभाग (कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी), पत्ता – शिवाजी विद्यापीठ परिसर, पोस्ट ऑफिसजवळ, विद्यानगर, कोल्हापूर. ४१६ ००४, दूरध्वनी – (०२३१) – २६०७०२२

८) नांदेड विभाग (नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर) द्वारा – स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, क्रीडा इमारत, नांदेड. ४२१ ६०६, दूरध्वनी – (०२४६२) – २२९९४०

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे संचालक व त्यांचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे –

१) मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखा – (०२५३) – २२३१४७५

२) वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा – (०२५३) – २२३१४७७

३) शिक्षणशास्र विद्याशाखा – (०२५३)- २२३१४७२

४) विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा – (०२५३) – २२३१४७३

५) संगणकशास्र विद्याशाखा – (०२५३) – २२३०७१७

६) निरंतर शिक्षण विद्याशाखा – (०२५३) – २२३१४८०

७) आरोग्य विज्ञान विद्याशाखा – (०२५३) – २२३०७१८

८) कृषिविज्ञान विद्याशाखा – (०२५३) – २२३०३४०

९) शैक्षणिक सेवा विभाग – (०२५३) – २२३००१०

आपल्या आवडत्या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी  त्वरित जवळचे अभ्यासकेंद्र, विभागीय केंद्रावर अथवा (०२५३) २२३०५८०, २२३०७३४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाच्या  http://ycmou.digitaluniversity.ac संकेतस्थळास भेट द्यावी.

(लेखकाशी संपर्क – मोबाईल – ९४०३७७४६९४. इ मेल – [email protected] 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशीभविष्य – मंगळवार – ८ सप्टेंबर २०२० 

Next Post

गुड न्यूज – आता राज्यात कोरोना चाचणीसाठी १२०० रुपये लागणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
corona 8

गुड न्यूज - आता राज्यात कोरोना चाचणीसाठी १२०० रुपये लागणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011