नाशिक – विद्या प्रबोधिनी प्रशाला (CBSE) च्या विद्यार्थ्यांनी तोरण बनवण्याच्या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आकर्षक तोरणे बनवून आपली कल्पकता दाखवून दिली.
दाराला तोरण लावणे हे भारतीय संस्कृतीची प्रथा असून यामुळे घरात सुख, शांती व लक्ष्मी येते. भारतीय संस्कृतीमध्ये सणासुदीला दारावर तोरण लावण्याचे खूप महत्व आहे, कोणत्याही मंगलप्रसंगी दारावर तोरण लावण्याची आपली परंपरा विद्यार्थ्यांना माहिती असावी म्हणून विद्या प्रबोधिनी प्रशाला CBSE च्या विद्यार्थ्यांनी तोरण बनवण्याच्या उपक्रमात उस्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला.
विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येऊ शकत नसले तरी ऑनलाईन पद्धतीचा पुरेपूर उपयोग करित गणेशोत्सवातील सर्व उपक्रम व आनंद दरवर्षीप्रमाणेच साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दिनांक २५ ऑगस्ट रोजी तोरण बनवण्याची स्पर्धा इयत्ता ५ ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेत ११८ विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून इको फ्रेंडली तोरण बनवायचे होते. प्लास्टिक, थर्माकोल चा वापर न करता विद्यार्थ्यांनी क्राफ्ट पेपर, रेशमी धागा इ. चा वापर करून विद्यार्थ्यांनी सुंदर तोरणं बनवली, त्यासाठी 1 तसाचा वेळ देण्यात आला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.लीना चक्रवर्ती यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
यासाठी संस्थेचे सर कार्यवाह मा दिलीप बेळगावकर, कार्यवाह मा हेमंत देशपांडे, पालक नितीन गर्गे, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.