हजारीबाग (झारखंड) – साधू बनून घरातीलच लोकांना गंडा घालणाऱ्या एका युवकाची स्थानिकांनी जमके धुलाई केली. हजारीबाग येथील इचाक ठाण्यातील पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
झाले असे की, येथील टाटीझरीया येथे राहणाऱ्या कौलेश्वर मिश्र यांचा १७ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अचानक घरी आला. परत आला तोच साधूच्या वेषात. इतक्या वर्षांनी आपला मुलगा घरी आला म्हणून घरचे लोक त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते आणि हा मात्र प्रत्येकाकडून पैसे उकळण्यात गर्क होता. या वेडामुळेच त्याचे सोंग उघड झाले.
पैसे मागण्यासाठी हा तोतया साधू शनिवारी कौलेश्वर मिश्र यांच्या मोठ्या मुलीच्या सासरी जाऊन पोचला. मात्र, थेट सासरी आल्याने लोकांना संशय आला. त्यांनी त्याची कसून चौकशी केली तेंव्हा त्याचे सोंग उघडे पडले. घरातील व्यक्ती आणि स्थानिकांनी त्याला मारहाण केल्यावर त्याने आपण सुबोध मिश्रा (कौलेश्वर मिश्रा यांचा हरवलेला मुलगा) नसल्याचे मान्य केले. तसेच आपण शफीक अन्सारी असून मूळचे उत्तर प्रदेशातील गोंडा येथील असल्याचे सांगितले. तब्बल तीन महिने त्याने मिश्रा परिवाराला फसवले.