गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भूखंड खरेदी विक्री व्यवहारातील वाढीव रकमेवरून तिघांनी केली मायलेकास मारहाण

by India Darpan
जानेवारी 14, 2021 | 10:36 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

मायलेकास मारहाण
नाशिक : भूखंड खरेदी विक्री व्यवहारातील वाढीव रकमेवरून तिघांनी मायलेकास मारहाण केल्याची घटना सिडकोतील पाटील नगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत पोपट गिते,नाना पोपट गिते व त्यांचे मित्र अशी मायलेकास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी दिपक नाना अभंग (रा.विवेकानंद चौक,पाटील नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. अभंग मंगळवारी (दि.१२) रात्री आपल्या घरासमोर उभे असतांना संशयीत तेथे आले. त्यांनी प्लॉटच्या जुन्या व्यवहाराचे वाढीव पैसे घेण्याच्या कारणातून कुरापत काढून शिवीगाळ करीत अभंग व त्यांच्या आईला लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.

……..

नाशिक : ओढा येथील रेल्वे कॉलनीत राहणा-या ४० वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नवनाथ मुरलीधर ताडगे (रा.रेल्वे कॉलनी ओढा) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. ताडगे यांनी बुधवारी (दि.१३) आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये अज्ञात कारणातून छताच्या पंख्यास ओढणी बाधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.

……..
दुचाकीवरून पडल्याने वृध्दाचा मृत्यु
नाशिक : भरधाव दुचाकीवरून चक्कर येवून पडल्याने ६९ वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला. हा अपघात तारवालानगर सिग्नल भागात झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अरूण सोमनाथ जोशी (रा.संध्या पुजा सोसा.म्हसरूळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. जोशी मंगळवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास दिंडोरीनाक्याकडून मेरीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. तारवालानगर सिग्नल परिसरात भरधाव दुचाकीवर अचानक चक्कर आल्याने ते पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक लिलके करीत आहेत.

……..
पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यु
नाशिक : बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला. ही घटना चेहडी येथे घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. बाळासाहेब बाबुराव बनकर (रा.बनकरमळा,चेहडी बु. सिन्नरफाटा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बाळासाहेब बनकर बुधवारी (दि.१३) आपल्या राहत्या घरात बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.

……..
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक : भरधाव अज्ञात वाहणाने दिलेल्या धडकेत ४१ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात सिटी सेंटर ते गोविंदनगर मार्गावर झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.   विजय किशोर वैद्य (रा.पीटीसी,त्र्यंबकरोड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. वैद्य बुधवारी (दि.१३) सि.टी.सेंटर मॉल कडून गोविंदनगरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. सिग्नल नजीकच्या पुलाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने वैद्य जखमी झाले होते. वोक्हार्ट रूग्णालयात प्रथमोपचार करून भाऊ जय वैद्य यांनी त्यानी दिंडोरीनाका येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

……..
विहीतगाव येथे वृध्दाची आत्महत्या
नाशिक : विहीतगाव येथील ६२ वर्षीय वृध्दाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोद करण्यात आली आहे.
सुकदेव महादू रोकडे (रा.कोठुळे गल्ली,विहीतगाव) असे आत्महत्या करणा-या वृध्दाचे नाव आहे. रोकडे यांनी बुधवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
……

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कामगार नगरला धाडसी घरफोडी, भरदिवसा साडे बारा लाखाच्या तिजोरीवर डल्ला

Next Post

अजित डोवाल यांनी दिली अचानक काबूलला भेट…

India Darpan

Next Post
EroP92yW8AUHoyP

अजित डोवाल यांनी दिली अचानक काबूलला भेट...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011