नाशिक – मेट इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी, नाशिक मध्ये “२५ सप्टेंबर” या जागतिक फार्मासिस्ट दिवसाचे औचित्य साधून शहरातील सर्व फार्मासिस्ट यांना “कोरोना योद्धा फार्मासिस्ट” म्हणून गौरवण्यात आले.
फार्मासिस्ट औषध विक्रीच नव्हे तर औषध निर्मिती,संशोधन ,मार्केटिंग, क्लिनिकल रीसर्च ,हॉस्पिटल फार्मासिस्ट, रिटेल फार्मसी इत्यादी अनेक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावतात.कोव्हीडने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे या विरुद्ध लढताना डॉक्टर,नर्स, पोलीस या फ्रंट लाईन वारीयर सोबतच “फार्मासिस्ट” चा सुद्धा अत्यंत महत्वाचा वाटा आहे.
फार्मासिस्ट बांधवांचे आरोग्य सेवेतील महत्व,गरज व कामगिरी लक्षात घेऊन आपण सर्वानी त्यांच्या बद्दल कृतन्य असले पाहिजे ,त्यांच्या कार्याचा समाजाकडून गौरव झाला पाहिजे ,तसच सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचा उचित सन्मान व्हावा,या उद्देशाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यातर्फ अहोरात्र निर्भीड पणे सेवा देणाऱ्या फार्मासिस्ट बांधवांचे “कोरोना योद्धा फार्मासिस्ट” म्हणून गौरव करण्यात आला.
तसेच महाविद्यालयातर्फ ई-पोस्टर व विडिओ मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यासाठी महाराष्ट्रातील विवीध भागातील बऱ्याच महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सर्व सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना ई -सर्टिफिकेट देण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन प्रा. अमोल कोतकर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रिझवान शेख यांच्या मार्गदर्शनाने केले.