मुंबई – राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित मंगळवारी भाजपाच्या मुंबईतल्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश करणा-यांमध्ये भाजपचे अजय मकवाना, हर्षल गुरव, प्रथमेश मिस्री, विनायक पोळके,सुनिल धुरी यांचा समावेश आहे. भुजबळ यांनी या सर्वाचे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक उपस्थित होते.