गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भिवतास धबधब्याची मोहिनी; हा व्हिडिओ पाहून तुमचीही पावले तिकडे वळतील

by India Darpan
ऑगस्ट 16, 2020 | 9:39 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20200815 161215 scaled

दिंडोरी – सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधब्याने सध्या पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. नाशिक जिल्ह्यासह गुजरातमधील पर्यटक सध्या तेथे येत असून यानिमित्ताने निसर्गाचा अनोखा नजारा त्यांना पहावयास मिळत आहे. तसेच, कोरोनाच्या संकटात या धबधब्याने अनेकांमध्ये चैतन्य निर्माण होत आहे.

दाट वनराई हिरवाईने नटलेली त्यात कोसळणारा पाऊस, गार वारा, धुक्याची चादर असे नयनरम्य दृश्य सद्या दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग व पेठ-सुरगाणा तालुक्यातील दऱ्या डोंगर पर्यटकांना आकर्षित करत आहेत. सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. शनिवारी आलेला स्वातंत्रदिन आणि रविवारची सुटी यामुळे दोन्हीं दिवशी शेकडो पर्यटकांनी भिवतास येथे भेट देत पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला.

दिंडोरी तालुक्यातील गोळशी, ननाशी, भनवड, मांजरपडा, देवसाने परिसरात घाटमाथ्यावर सध्या धुक्याची चादर पसरली आहे. ननाशी पासून पश्चिमेला ३० किलोमीटरवर बाऱ्हे जवळ केळवण येथे नार नदीवर भिवतास हा धबधबा आहे. नाशिक जिल्ह्यासह गुजरात मधूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत आहेत. परिसरातील विविध नदी, नाले, घाट, रस्ते, छोटे, छोटे धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. फोटो व व्हिडिओ काढत पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. मात्र, धबधब्याजवळ सुरक्षा कठडे नाही. त्यामुळे बाऱ्हे पोलिसांनी येथे बंदोबस्त ठेवत पर्यटकांना असुरक्षित जाण्यास मज्जाव केला.

विकास करणे आवश्यक 
दिंडोरी, पेठ व सुरगाणा घाटमाथ्यावर निसर्गाची अनमोल कृपावृष्टी आहे. पावसाळ्यात एकदा भेट दिलेला पर्यटक येथे दरवर्षी येतोच. त्यादृष्टीने सरकारने विविध पर्यटक स्थळांचा विकास करणे गरजेचे आहे. भिवतास येथील धबधब्याजवळ मोठी दरी आहे. ती अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे येथे सुरक्षा कठडे असणे आवश्यक आहे. वनविभागाने विविध ठिकाणी पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. सदर क्षेत्राचा विकास झाल्यास परिसरात रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

“धामडकीवाडी पॅटर्न”ने मनामनात रुजली शाळा; इगतपुरी तालुक्यातील अनोखा प्रयोग यशस्वी

Next Post

पार्थची नाराजी दूर करण्यासाठी बारामतीत कुटुंबियांची बैठक

Next Post
EfC62wsU4AUPB1f

पार्थची नाराजी दूर करण्यासाठी बारामतीत कुटुंबियांची बैठक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011