नवी दिल्ली – भारतातून आपल्या देशात विमानाद्वारे कोरोना लस पोहचल्यावर डोमिनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कर्ट यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनतेचे कौतुक केले. इतकेच नव्हे तर भावूक झालेल्या पंतप्रधानांनी स्वतः या लसीचे खोके विमानातून उतरवले.
कमी लोकसंख्येच्या डोमिनिकन रिपब्लिक या बेटावरील देशात भारतातून 35 हजार कोरोना लस आल्या आहेत. भारताने आतापर्यंत अनेक शेजारच्या देशासह अन्य देशांना लसी देण्यात आल्या आहेत. यापुर्वी बार्बाडोस, भूतान, मालदीव, नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेश यासह अनेक देशांना भारताने निर्मित लस पुरवल्या आहेत. लस फ्रेंडशिप उपक्रमांतर्गत आता ‘मेड इन इंडिया’ या लस बार्बाडोस आणि डोमिनिकामध्येही पोहोचल्या आहेत.
त्यावेळी, डोमिनिकाचे पंतप्रधान लसबद्दल इतके भावनिक झाले की ते स्वत: कोरोना लसचे बॉक्स घ्यायला विमानतळावर गेले. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. त्याचबरोबर बार्बाडोसच्या महिला पंतप्रधान मिया मोटले यांनी पंतप्रधान मोदींचे लसींच्या पुरवठ्याबद्दल आभार मानताना म्हटले आहे की, मी भारत सरकारचे आणि जनतेचे आभार मानते, माझे सरकार आणि येथील लोकांच्या वतीने मी आपले सरकार आणि भारतीय लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छित आहे. लस फ्रेंडशिप उपक्रमांतर्गत कोविशिल्ट लसची पहिली खेप भारताने बार्बाडोस आणि डोमिनिका येथे पाठविली.