नाशिक – इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पूर्ण भरल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
जलपूजन प्रसंगी यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपविभागीय अभियंता प्रमोद कुलकर्णी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, शाखा अभियंता सुरेश जाचक, निवृत्त शाखा अभियंता सुहास पाटील आदी उपस्थित होते. भावली धरण परिसरात आज अखेर २१५१ मिमी पाऊस झाला असून एकूण १४३४ दशलक्ष घनफुट पाणीसाठा असलेले भावली धरण पूर्णपणे भरले असल्याने जलपूजन करण्यात आले. या धरणातून आतापर्यंत ९४८ क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली.