मुंबई – राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी ८ डिसेंबरच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या बाजार समित्या बंद राहणार आहेत. केंद्र सरकारने कृषी विषयक केलेले तिन्ही कायदे रद्द करावेत, यासाठी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यास देशाच्या सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या समित्या बंद राहणार आहेत. त्याशिवाय नवी मुंबई, सोलापूर, पुणे, धुळे येथील बाजार समित्याही बंद राहणार आहेत. माथाडी कामागारांनीही बंदला पाठिंबा दिला आहे.
पक्ष, संघटनांचा पाठिंबा
भारतातील अनेक राजकीय पक्ष, स्वसंयेवी संस्था, संघटना, शेतकरी संघटना यांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनीही बंदमध्ये सामिल होण्याची घोषणा केली आहे.