नाशिक – तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. यापार्श्वभूमीवर नाशिककरांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी खालील माहिती दिली आहे.
—
उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाशी चर्चा केलेली आहे. त्यांनी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील व प्रमुख रस्ते कार्यरत राहतील याबद्दलचे पूर्वनियोजन केलेले आहे
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक