मुंबई – शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही मोठा निर्णय घेतला आहे. आंदोलनाची योग्य ती दखल घ्यावी आणि संवेदनशील असलेल्या भागांमध्ये एसटीची सेवा देऊ नये, असे निर्देश महामंडळाने सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. स्थानिक प्रशासनाने योग्य ती माहिती घेऊन वाहतूक सेवा द्यायची की नाही, याचा निर्णय घ्यावा, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. सरसकट राज्यत सेवा बंद केली जाणार नाही. स्थानिक पातळीवर किंवा त्या त्या भागात योग्य तो निर्णय उद्याच घेतला जाईल, असे महामंडळाने सांगितले आहे.