नवी दिल्ली – सीरम इन्स्टिट्यूटकडून पुणे इथं तयार होणारी ऑक्सफोर्ड एस्ट्रजेनेकाची कोविशिल्ड लस आता लवकरच पाकिस्तानला मिळणार आहे. भारत लसीचे १.६ कोटी डोस पाकिस्तानला मोफत देणार आहे.
या लसीद्वारे पाकिस्तान आपल्या ४.५ कोटी नागरिकांना लसीकरण सुरू करणार आहे. दैनिक एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी संसदेच्या लोक लेखा समितीला (पीएसी) ही माहिती दिली.
पाकिस्तानची लसीकरण मोहीम मोफत लसीवर
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य संस्था (एनआयएच)च्या अधिकार्यांनी पीएसीला सांगितलं, पाकिस्ताचा मुख्य लसीकरणाचा कार्यक्रम मोफत लसीवर अवलंबून आहे. कारण चीनमध्ये तयार होणारी कॅनसिनो लशीची किंमत पाकिस्तानच्या चलनात प्रतिव्यक्ती जवळपास दोन हजार रुपये (१३ डॉलर) आहे.
या महिन्याच्या मध्यापर्यंत पाकिस्तानला लस
मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत भारत पाकिस्तानला मोफ लशीचा पुरवठा करेल, असं अधिकार्यांनी सांगितलं. उर्वरित डोस जूनपर्यंत पाकिस्तानात पोहोचतील. पाकिस्तान आपल्या ४.५ कोटी नागरिकांना लसीकरणासाठी मोफत लसीवर अवलंबून असणार आहे.
कोविशील्ड लसीचा पुरवठा
देशात वेगानं लसीकरण करताना भारत दुसऱ्या देशांनाही लस उपलब्ध करून देत आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात इतर देशांना मदत करण्याच्या वचनानुसार भारत आता शेजारील देश पाकिस्तानसुद्धा लसीचा पुरवठा करणार आहे. पाकिस्तानचे आरोग्य सेवेचे सचिव आमीर अशरफ ख्वाजा यांनी लोक लेखा समितीला सांगितलं, की भारतात तयार होणार लस पाकिस्तानला याच महिन्यात मिळणार आहे.