नवी दिल्ली – भारत आणि चीन सैन्यात पुन्हा एकदा संघर्ष झाल्याची बाब समोर आली आहे. गेल्या ३ दिवसांपूर्वी सिक्कीम मधील नाकूला भागात ही झटपट झाल्याची बाब सूत्रांनी दिली आहे. यापूर्वीच दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. तसेच, गेल्या जून महिन्यात भारत-चीन सैन्यात हिंसक संघर्ष झाला होता. त्यातच आता पुन्हा दोन्ही सैन्य आमने सामने आले आणि त्यातून झटापट झाल्याचे सांगितले जात आहे. भारत आणि चीन असे दोन्ही बाजूचे सैन्य यात जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी दोन्ही देशांमध्ये तणावात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या झटापटीत भारताचे ४ तर चीनचे २० सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहेय
दरम्यान, याप्रकरणी अद्याप दोन्ही देशांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.