नवी दिल्ली – आठ जानेवारीपासून भारत आणि ब्रिटन विमानसेवा पुन्हा सुरु होणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विमानवाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. २३ जानेवापर्यंत दर आठवड्याला केवळ तीस विमानांचं उड्डाण होणार आहे. मालवाहू विमानांची उड्डाणंही दर आठवड्याला पंधरापुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा रचना बदललेला विषाणू आढळून आल्यामुळे ही सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र मर्यादित स्वरूपात ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.