नवी दिल्ली – भारती ॲक्सा सामान्य विमा व्यवसाय संपादन करण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डला सीसीआय म्हणजेच भारतीय स्पर्धा आयोगाने मान्यता दिली आहे. स्पर्धा कायदा, 2002 मधील अनुच्छेद 31 (1) अनुसार भारती ॲक्साचे आयसीआयसीआय अधिग्रहण करणार आहे.
आयसीआयसीआय लोम्बार्ड ही एक सामान्य विमा कंपनी आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) मध्ये या कंपनीची नोंद झाली आहे. या कंपनीच्यावतीने मोटार वाहन, आरोग्य, आग, व्यक्तिगत अपघात, सागरी, अभियांत्रिकी आणि इतर विविध प्रकारच्या श्रेणीमध्ये विमा कवच प्रदान करण्यात येते.
भारती ॲक्सा ही सुद्धा आयआरडीएआयमध्ये नोंदणी करण्यात आलेली सामान्य विमा कंपनी आहे. यामध्ये भारती जनरल व्हेंचर्स कंपनीचा 51 टक्के आणि सोसायटी ब्युजॉन कंपनीचा 49 टक्के हिस्सा आहे. भारती ॲक्सा ग्राहकांना मोटार, आरोग्य, प्रवास, पीक आणि गृह विमा यांच्यासह इतरही विमा संरक्षण सेवा देत आहे.
या प्रस्तावित अधिग्रहणामध्ये आयसीआयसीआय लोम्बार्डमधील हिस्श्याच्या बदल्यात भारती ॲक्साचा सर्व सामान्य विमा व्यवसाय आता आयसीआयसीआय लोम्बार्डमध्ये विसर्जित करण्यात येणार आहे.
यामध्ये भारतीय स्पर्धा आयोगाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे.