नवी दिल्ली – पाकव्याप्त काश्मिरमध्ये (पीओके) ‘पिनपॉईंट स्ट्राईक’ केल्याच्या वृत्तात कुठलेही तथ्य नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. या स्ट्राईकमध्ये पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचे सागितले जात होते. यासंदर्भात विविध प्रकारच्या मिडियामध्ये वृत्त प्रसारित झाले होते.
याप्रकरणी केंद्र सरकार, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय किंवा भारतीय लष्कर यांनी कुणीही अधिकृतपणे माहिती दिलेली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेचे उल्लंघन पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहे. सीमेवरुन दहशतवाद्यांना भारतीय भूमीत पाठविण्याचा मोठा कट या स्ट्राईकने उधळून लावल्याचे वृत्तात म्हटले होते. मात्र, अशा प्रकारची कुठलीच कारवाई झाली नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.